जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्य सरकारनं ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी मनोज सौनिक यांची, मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे रविवारी मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होत असल्याने ,राज्य सरकारने ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी मनोज सौनिक यांची, मुख्य सचिव पदावर नियुक्ती केली आहे. दरम्यान राज्य सरकारच्या पुढील आदेशापर्यंत, मुख्य सचिव पदी नियुक्ती झालेले मनोज सौनीक यांचेकडे, अपर मुख्य सचिव वित्त व अपर मुख्य सचिव बांधकाम विभाग या दोन्हीही पदांचा कार्यभार राहणार आहे. दरम्यान राज्याच्या मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त होत असलेले मनुकुमार श्रीवास्तव यांची, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सरकारने ,त्यांची मुख्य सचिव पदाची चांगली कारकीर्द लक्षात घेता, राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी निवड केली आहे राज्याचे मुख्य सेवा हक्क आयुक्तपदी निवड करण्यात आलेले मनुकुमार श्रीवास्तव यांची नेमणूक, ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी असणार आहे.