जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळचा 10वी व 12वीचा परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून, 12वीच्या परीक्षेचा निकाल जवळपास 97.33% लागला असून, तर 10वीचा निकाल 93.12 टक्के लागला आहे .केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटhttp://cbse.gov.in आणिhttp://results.nic.in वर उपलब्ध झालेला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून ,केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी व 12वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी, येणाऱ्या आधुनिक काळाकडे लक्ष देऊन ,ज्या क्षेत्रात विद्यार्थ्याला स्वारस्य असेल अशा क्षेत्रात, विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसई चा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षेत्राकडे वळायचे? याची चर्चा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्यात सुरू झाली आहे. यंदाच्या वर्षी 12 वी चे व 10 वी चे निकाल जाहीर झाल्यानंतर, कोणत्या क्षेत्राला जास्त गुणवत्तेचे मेरिट लागणार आहे? हे लवकरच समजणार आहे.