जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दि. 28 मे 2023 वार रविवार रोजी, कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, कोल्हापुरातील गांधी मैदानात सायंकाळी ठीक 5:00 वाजता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित जाहीर सभा होणार आहे. शिवाय शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत कार्यक्रमास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर दौऱ्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारने विविध योजनांचा लाभ जनतेला मिळण्यासाठी, शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत राबवण्यात येत असून, त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत आहेत. सध्या राज्यातील महाराष्ट्र शासन आपल्या दारी अभियानांतर्गत सुरू असलेल्या सर्व योजना, जनतेपर्यंत पोहोचण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 75000 नागरिकांच्या पर्यंत शासनाच्या योजना, पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.