जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांनी पद व गोपनीयतेची, आज बंगळूर येथिल कांटेरावा स्टेडियमवर येथे शपथ घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा, कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी पद व गोपनियतेची शपथ घेतली. आजच्या कार्यक्रमाला राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे उपस्थित होते. आजच्या कर्नाटक राज्याच्या शपथविधी झालेल्या मंत्रिमंडळात 8 आमदारांनी शपथ घेतली असून, यात राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मुलाचा समावेश आहे. कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली .आज बेंगळूर मधील कांटेरावा स्टेडियमवर हजारोंच्या उपस्थिती शपथविधी समारंभ पार पडला. कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या याना मुख्यमंत्री म्हणून व डि.के. शिवकुमार याना उपमुख्यमंत्री म्हणून शपथ देऊन ,इतर जी. परमेश्वर, के. एच. मुनियाप्पा, के .जे. जॉर्ज, एम. बी .पाटील यांची कॅबिनेट मंत्री म्हणून व सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र) रामलिंगा रेड्डी ,जमीर अहमद खान यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्यास ,काँग्रेसचे नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी ,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आदी मान्यवर उपस्थित होते. बेंगलोर मधील काँटेरावा स्टेडियमवर झालेल्या शपथविधी सोहळ्यास, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शेवटी व्यासपीठावर आले व आमच्या पक्षाने दिलेली पहिला 5 आश्वासने ही, पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत पूर्ण केली जातील असे प्रतिपादन त्यानी केले.