जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
बंगालच्या उपसागरातील तयार झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे, महाराष्ट्र राज्याला काही ठिकाणी, पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. राज्यात यामुळे यापुढे 4 दिवस अति मुसळधार पावसाचे, अस्मानी संकट उभारणार आहे. आधीच होत असलेल्या अवकाळी पावसामुळे, शेतकरी वर्ग चिंतेत सापडला असून, यात आता पुन्हा मोचा चक्रीवादळाने उद्भवणाऱ्या परिस्थितीत, शेतकरी वर्ग सापडला आहे. महाराष्ट्र राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ,मुसळधार व अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा, इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार ,नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, आदी जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह, अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यातील विदर्भासह कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमालाची काळजी घ्यावी, तसेच राज्यातील शेतकऱ्यांनी पिकांच्या बाबतीत सुद्धा योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.बंगालच्या उपसागरातील निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे, राज्यात यापुढील 4 दिवस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून , संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनास योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.