जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीतील, रेल्वे पूल 509 (RUB No. 271/2 at IR Km. 271.294) (शिंदे मळा ते अहिल्यादेवी होळकर चौक (लव्हली सर्कल) चे बांधकाम सुरू करावयाचे असल्याने सदर पुला खालील रस्त्यावरून होणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.
मोटार वाहन कायदा 1988 कलम 115 व 116 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी रेल्वे पूल 509 (RUB No. 271/2 at IR Km. 271.294) (शिंदे मळा ते अहिल्यादेवी होळकर चौक (लव्हली सर्कल) या पुला खालील रस्त्यावरून होणारी वाहतूक 15 मे 2023 ते 4 जून 2023 या कालावधीसाठी पुढील मार्गावरून वळविण्याचे तसेच वाहतुक सुरक्षा उपाययोजनेव्दारे वाहतूक नियंत्रीत करण्याचे आदेश दिले आहेत.
सांगली शहरातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठीचा मार्ग - (१) शिंदे मळा रेल्वे ब्रिजखालून न येता काळी खण - बायपास रोड पोलीस चौकी - कॉलेज कॉर्नर - आपटा पुष्पराज चौक सांगली मिरज रोड विश्रामबाग चौकातून डावीकडे वळण घेऊन नविन ओव्हर ब्रिजवरून कुपवाड रोडकडे जाता व येता येईल. (२) सांगली शहरातून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनासाठीचा मार्ग - कॉलेज कॉर्नर टिंबर एरीया मार्केट यार्ड चौक सांगली मिरज रोड - विश्रामबाग - चौकातून डावी कडे वळण घेऊन विश्रामबाग नविन ओव्हर ब्रिज मार्गे - कुपवाड रोड मार्गे जाता व येता येईल.
कुपवाड कडून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी सांगली शहरात जाणे व येण्यासाठीचा मार्ग - लक्ष्मीमंदिर चौक - मंगळवार बाजार चौक अहिल्यादेवी होळकर चौकातून उजवीकडे वळण घेऊन - 100 फुटी रोडने संजयनगर - ज्युबिली कारखान्याकडून डावीकडे वळण घेऊन औद्योगिक वसाहत मार्गे आर.टी.ओ. ऑफीस - तासगाव रोड मार्गे सांगली शहरात येता व जाता येईल.
जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी या उपाययोजना कार्यकारी अभियंता, मध्य रेल्वे, मिरज, पोलीस अधीक्षक सांगली, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली व कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी याबाबत एकत्रितपणे कराव्यात, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.