जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
यंदाच्या वर्षीचा मान्सून चा प्रवास हा जरा लांबला असल्याने, 4 जून च्या आसपास नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून केरळात दाखल होईल असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन सूत्रानुसार 1 जून पर्यंत सर्वसाधारण केरळमध्ये मान्सून दाखल होत असतो .त्याच्या आसपास 7 दिवस, उशिरा किंवा अगोदर मान्सूनचे आगमन होते. मान्सूनचे सर्वसाधारण केरळमधील आगमन हे, भारतातील किमान तापमान, हिंदी महासागरातील आग्नेय दिशेकडून खालच्या थरात वाहणारे वारे, प्रशांत महासागरावर समुद्र सपाटी लगतचा हवेचा दाब आधी विविध गोष्टींचा अभ्यास करून भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर करण्यात येतो. यापूर्वीच्या काही वर्षात मान्सून केरळात दाखल होण्याचे सन 2018, 2019, 2020, 2021,2022 साली अनुक्रमे 29 मे, 8 जून, 1 जून, 3 जून, 29 मे असा होय. शिवाय यावर्षीचा भारतातील पाऊस अनुमान, जवळपास 96 टक्के च्या आसपास राहील, असे पहिल्या अंदाजात हवामान खात्याने म्हटले आहे .दुसरा अंदाज लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान स्कायमेट वेदर या संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षीचे मान्सूनचे आगमन विलंबाने होत असल्याचे म्हटले आहे. तथापि या सर्व बाबतीत खुलासा ,सध्याच्या परिस्थितीत लगेच करणे ,योग्य ठरणार नाही असे स्कायमेट वेदर या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.