जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत पावसाळ्यातील पूर व आपत्तींचा सामना करण्यासाठी शासनाने सर्व सज्जता ठेवावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केली आहे. ते आज आपत्ती नियंत्रण पथकाची प्रात्यक्षिके सादर होताना बोलत होते. दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात पूर हा येतच असतो. शिवाय पुराच्या दरम्यान उद्भवणारी सांभाव्य आपत्ती जनक स्थिती, ही दरवर्षी उत्पन्न होत असते .यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता चोख ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केले आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे येणाऱ्या पूर व पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीजनक स्थितीवर मात करण्यासाठी, आज महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने, पूर्व तयारीचा भाग म्हणून, कृष्णा नदीकाठी प्रात्यक्षिके घेण्यात आली. सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांचे सह सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी व स्थानिक प्रशासनातील सर्वाधिकारी वर्ग उपस्थित होते.सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महापालिका उपायुक्त राहुल रोकडे, यांनी संबंधित पूर परिस्थिती हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधून, एकंदरीत कामकाजाच्या संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी, पूर परिस्थिती 2021 च्या अनुसार बोटिंग ची संख्या कमी असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे 4 बोटिंची मागणी केली आहे. शिवाय जिल्हा परिषदेने देखील काही बोटी विकत घेतल्या आहेत. संभाव्य आपत्ती जनक पूरस्थितीची उपाययोजना करण्यासाठी, महापालिकेला सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले आहे .
सांगलीतील दरवर्षी होणाऱ्या संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी, आज कृष्णा नदीच्या पात्रात प्रात्यक्षिके करण्यात आली. सांगलीतील अग्निशमन दलातर्फे विविध प्रात्यक्षिके सादर झाली. सांगलीतील दरवर्षी येणाऱ्या आपत्तीजनक पूरस्थितीवर मात करण्यासाठी, नियोजनाचा भाग म्हणून झालेल्या प्रात्यक्षिकाच्या वेळी, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, सांगली- मिरज आणि कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी ,महापालिका उपायुक्त राहुल रोकडे ,सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, स्थानिक नगरसेवक युवराज बावडेकर, सुबराव मद्रासी ,उर्मिला बेलवलकर, अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी विजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते.