जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
मणिपूर मधील हिंसाचारातील मृतांची संख्या जवळपास 54 वर पोहोचली असून, तेथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अनाधिकृत वृत्तानुसार मृतांची संख्या मोठी असू शकते असे समजते आहे.आज मणिपूर मधील दुकाने, व्यावसायिक संस्था,हॉटेल्स इतर दुकाने उघडली गेल्याचे दिसून येत असून ,हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत असून ,रस्त्यावरील वाहतूक सुद्धा पूर्वपदावर येऊ लागली आहे. मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ मध्ये ,आज सकाळी दुकाने उघडल्या उघडल्या बरोबरच ,जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती .दरम्यान सांभाव्य तणाव टाळण्यासाठी, प्रशासनाने चोख सुरक्षा बंदोबस्त ठेवला असून ,आत्तापर्यंत मरण पावलेल्या 54 मृतांपैकी, 16 जणांचे मृतदेह चुराचांदपूर जिल्हा रुग्णालयात शवगारात ठेवण्यात आले आहेत. इम्फाळ मधील लामफेल येथील रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये 23 मृतदेह शेवगारात ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान चुराचांदपूर जिल्ह्यामध्ये रविवारी रात्री झालेल्या चकमकीमध्ये, इंडिया रिझर्व बटालियनचे 2 जवान देखील जखमी झाले आहेत. संपूर्ण मणिपूर राज्यामध्ये जनजीवन एकंदरीत हळूहळू पूर्वपदावर येत असून, प्रशासनाने अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन करून, चोख बंदोबस्त ठेवला आहे. काही ठिकाणी लष्कराचे व राज्य राखीव पोलीस दलाचे संचालन होत असून, सुरक्षेच्या कारणास्तव दिवस रात्र लष्कराची गस्त चालू आहे. दरम्यान प्रशासनाने अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे .एकंदरीत मणिपूर हिंसाचारानंतरची परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.




