जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ,भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युतीला 9 जागांवर तर शिवसेना शिंदे गट व काँग्रेस गटाच्या युतीला 9 जागांवर विजय मिळाला आहे .त्यामुळे सत्ता संघर्ष एका उत्कंठावर्धक स्थितीच्या मोडवर आला आहे .आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीला 9 जागा विजय मिळाल्याने व शिवसेना शिंदे गट ,काँग्रेस गटाच्या 9 जागा वर विजय मिळाल्याने, एकंदरीतच राजकारणातील स्थिती रंगतदार वळणावर पोचली आहे.
दरम्यान मतदानाच्या वेळी वाद झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काळेवाडी गावातील एक ग्रामपंचायत सदस्यांमध्ये हा वाद झाला असून, वादावादीचे रूपांतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी काळेवाडी ग्रामपंचायत सदस्य मंगेश सस्ते यांना मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. सर्व घटनेमुळे मतमोजणी परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. एकंदरीतच आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गालबोट लागल्याचे दिसत आहे.