जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी ग्राउंड वर 1 मे च्या महाराष्ट्र दिनी, महाविकास आघाडीच्या नेत्यांची भव्य वज्रमुठ सभा असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून, मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी ग्राउंडवर वज्रमुठ सभेची जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी वज्रमुठ सभेच्या तयारीचा आढावा घेतला आहे, तसेच पोलीस प्रशासनाकडूनही सभास्थळी सुरक्षेची पाहणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीचे व शिंदे गटाचे सरकार विरोधात महाविकास आघाडीने वज्रमुठ सभेच्या अभियाना अंतर्गत, महाराष्ट्रात 16 सभा घेतल्या जाणार असून, या सभेमध्ये महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.
त्यानुसार पहिली सभा छत्रपती संभाजी नगर मधील झाली असून, या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते. त्यानंतर लगोलग आज दुसरी सभा नागपुरात पार पडली असून ,आजची तिसरी सभा मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी ग्राउंड वर होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने वज्रमुठ सभेच्या निमित्याने, महाराष्ट्रातील भाजप शिंदे गटाच्या सरकार विरोधात आरोप केले जाणार असून, एकंदरीतच महाराष्ट्रातील राजकारण व वज्रमुठ सभेच्या निमित्ताने ढवळून निघणार आहे. एकूण महाराष्ट्रात वज्रमूठ सभेच्या निमित्ताने सर्व महाविकास आघाडीचे नेते एकत्र येऊन, महाराष्ट्रातील फडणवीस शिंदे सरकारच्या विरोधात जनतेमध्ये जाऊन आवाज उठवतील असे दिसत आहे.