जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
( अनिल जोशी )
भारतातील रस्ते आणि महामार्ग यांची कामे ,संबंधित कॉन्ट्रॅक्टरानी व्यवस्थित न केल्यास, बडतर्फी सह कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. ते आज नांदेड जिल्ह्यात श्रीक्षेत्र माहूरगड येथे, स्कायवॉक बांधकाम भूमीपूजन प्रसंगी बोलत होते .आजपर्यंत रस्ते व महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात, बऱ्याच तक्रारी दाखल झालेल्या आहेत. त्यानुसार तक्रारींची दखल घेऊन, संबंधित कंत्राटावर कारवाई देखील करण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते ,वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे .दरम्यान राज्यातील शेगाव, शिर्डी व राज्याबाहेरील तिरुपती ही तीर्थक्षेत्रे हे स्वच्छतेचे आदर्श मानके असून, माहूर क्षेत्र सुद्धा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रक्रमावर यावे यासाठी माहूर नगर परिषदेने व नागरिकांनी विशेष काळजी घेण्यात यावी असे आवाहन त्यांनी केले .माहूरनगर परिषदेने, माहूर मधील रस्त्यांच्या दुतर्फी बाजूस, किमान 3000 झाडे लावण्याचा संकल्प करून व माहूर शहरवासीयांनी प्रत्येकी 3 झाडे लावण्याचे आवाहन, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. त्याबरोबरच नागपूरपासून- माहूरला अवघ्या 2.5 तासात अंतर पार करणे सोपे झाले आहे. शिवाय तिथल्या तीर्थक्षेत्राच्या विकासाबरोबर पर्यटन व त्या अनुषंगिक सेवा क्षेत्रात, मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी निर्माण होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले .माहूरच्या परिसरातील जैवविविधता वनसंपदा तसेच सुंदर डोंगराळ प्रदेशात, पर्यटनाला देखील मोठी संधी असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.