जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
राजस्थानमध्ये आज बिपरजॉय चक्रीवादळामुळे हाहाकार माजला असून, मुसळधार पाऊस चालू आहे.अंदाजे सुमारे 5000 नागरिकांना विस्थापित करण्यात आले असून, ही बिपरजॉय चक्रीवादळ हे पश्चिम राजस्थान मध्ये सक्रिय झाले आहे.राजस्थान मधील बाडमेर जिल्ह्यात 24 तासापासून पाऊस सुरू असून ,मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. बिपरजॉय वादळामुळे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहत असून, खबरदारीचा उपाय म्हणून बाडमेर जालोर येथील 5000 नागरिकांना विस्थापित करण्यात आले आहे. राजस्थान मधील बखासर येथे सर्वप्रथम बिपरजॉयचा प्रभाव पडला असून, त्यानंतर शेवडा, बखासर, धनाळ ,चौथण, धोरिमाण्णा आदी जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दि. 17 जून रोजी बारमेर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून ,एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळ ग्रस्त जिल्हे बाडमेर व जालोर मध्ये प्रशासनाकडून, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आलेआहे .एनडीआरएफच्या तुकड्या व लष्कराचे जवान, विविध मदत व बचाव करण्याच्या मदत कार्यात गुंतले असून, बिपरजॉय राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी विजेचे खांब तसेच झाडे पडली आहेत. 100हून अधिक बऱ्याच ठिकाणी, वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान बिपरजॉय चक्रीवादळ लवकरच क्षमणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. एकंदरीतच बिपरजॉय चक्रीवादळामुळे सध्या भारतात मान्सूनचा पाऊस लांबला असून ,त्याचा परिणाम देशभर दिसून येत आहे.