सांगलीमध्ये, कोयना व वारणा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन ,कृष्णा नदीतून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांना 19 जून पर्यंत उपसा बंदी.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगलीमध्ये सध्याच्या परिस्थितीत कोयना व वारणा धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेऊन, तसेच सध्याच्या तापमानातील वाढ लक्षात घेऊन, पावसाळ्यापर्यंत धरणातील उपलब्ध असलेला पाणीसाठा अत्यावश्यक कारणासाठी वापरण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11,49 मधील तरतुदीनुसार, सांगलीमध्ये कृष्णा नदी मधून शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर सुधारित उपसा बंदी आदेश, सांगली पाटबंधारे विभागातर्फे जारी करण्यात आलेला आहे.सांगली पाटबंधारे विभागातर्फे जारी केलेल्या आदेशाप्रमाणे, दिनांक 14 जून 2023 पासून 19 जून 2023 पर्यंत, कृष्णा नदीच्या पात्रात उपसा बंदी करण्यात आली आहे.अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना फक्त सुरू राहतील.यापुढील पडणाऱ्या पावसानुसार व परिस्थितीनुसार, पुढील नियोजन करण्यात येणार असून, उपसा बंदी कालावधीमध्ये फक्त पिण्याच्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी, कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्यावर बंदी घातलेली आहे.सदर कालावधीमध्ये कृष्णा नदीतून इतर कारणासाठी पाणी उपसा केल्यास,उपसा अनाधिकृत समजून, संबंधिताचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधी करता बंद करून, उपसा यंत्रसामुग्री संच जप्त करून, पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी.दरम्यान सध्याच्या परिस्थितीतील धरणांच्यामधील पाणीसाठा लक्षात घेऊन, औद्योगिक कारखान्यांनी प्रदूषित पाणी नदीत सोडू नये.त्यासाठी सर्व संबंधितांनी दक्षता घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे..

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top