जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
गुजरातच्या पोरबंदर येथून ,दक्षिण आग्नेय अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ, पुढील 24 तासात तीव्र होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी कमी दाबाचा पट्टा गोव्या पासून 920 किलोमीटर पश्चिम नैऋत्येस, मुंबईच्या 1120 किलोमीटर दक्षिण नैऋत्येस, पोरबंदर पासून ११६० किलोमीटर दक्षिणेकडे तयार झाला असून ,त्याचे रूपांतर चक्रीवादळात होत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे, केरळ किनारपट्टीच्या दिशेने त्याचा प्रभाव सरकत आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम मान्सून पुढे सरकण्याच्या वेगावर होण्याची शक्यता व्यक्त होत असताना, भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या चक्रीवादळामुळे देशभरातील एकूण पावसाच्या पडण्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत भारतात एलनिनोची परिस्थिती असून सुद्धा, नैऋत्य मोसमी मान्सूनचा पाऊस सामान्यपणे पडण्याची अपेक्षा असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे .एकंदरीतच बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोणताही मान्सून वर परिणाम होईल अशी शक्यता वाटत नसल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.