जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र सत्ता संघर्षाबाबत, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, आमदार निलंबनाचा चेंडू, विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात गेला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय घेतात ? याकडे लागलेले आहे. नुकतेच महाराष्ट्र सत्ता संघर्षाबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, लवकरच क्रांतिकारक निर्णय घेण्याचे वक्तव्य केले आहे. सद्य परिस्थितीत निर्णय सांगणे उचित होणार नाही, पण मेरीटच्या आधारावर निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे. आज ते स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्या दौलत या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. पूर्वी काळी बाळासाहेब देसाई यांनी ज्याप्रमाणे क्रांतिकारक निर्णय घेतले, त्याप्रमाणे मी लवकरच निर्णय घेणार असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुचित केले आहे. बाळासाहेब देसाई यांनी पूर्वी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णय क्षमतेच्या बाबतीत भाष्य करताना, वरील सूचक प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे.