जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
संत तुकाराम महाराजांच्यपालखीचे आज पहाटे सराटी येथून ,सकाळी ठीक 7:00 वाजता निरा नदीच्या पाण्याने महाराजांच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर, पुणे जिल्हा ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने अकलूज मध्ये प्रवेश केला. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे तिसरे गोल रिंगण, माने विद्यालयाच्या मैदानावर सकाळी ठीक 9:00 वाजता पार पडले. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या तिसऱ्या गोल रिंगणाच्या वेळी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. अकलूज मध्ये आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असून, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी सर्व जय्यत तयारी झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन आज माळशिरस येथे सायंकाळी होणार आहे. दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज नातेपुतेहून प्रस्थान असून, सायंकाळपर्यंत माळशिरस मध्ये दाखल होईल असा अंदाज आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दुपारी ठीक 2:00 नंतर पहिले गोल रिंगण पुरंदवडे येथे होणार असून, एकंदरीतच पहिल्या गोल रिंगणाचा सोहळा अलौकिक स्वरूपात पार पडणार आहे.