जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
संत तुकाराम महाराज यांची पालखी-
अकलूज मधून आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान झाले असून, पहिले उभे रिंगण माळीनगर येथे पार पडणार आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे माळीनगर येथील उभे रिंगण संपन्न झाल्यावर, पालखी बोरगावच्या दिशेने प्रस्थान करणार असून, आज बोरगाव येथे संत तुकाराम महाराज पालखीचा मुक्काम असणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी-
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आज पहाटे माळशिरसहून प्रस्थान केले असून, खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडल्यानंतर ,संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळापूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम वेळापूर मध्ये असणार आहे.