पंढरपूर वारी विशेष- पंढरपुरात आषाढीवारीच्या लाखो वारकऱ्यांच्या स्नानासाठी, उजनी धरणातून सोडलेले पाणी अखेर चंद्रभागा नदीमध्ये पोहोचले.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

पंढरपुरात आषाढी एकादशीच्या वारीसाठी जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या स्नानासाठी, उजनी धरणातून सोडलेले पाणी अखेर आज चंद्रभागे पोहचले आहे. शासनाने दरवर्षीप्रमाणे पंढरपुरातील आषाढी एकादशीच्या वेळी जमणाऱ्या वारकऱ्यांच्या पवित्र स्थानासाठी, उजनी धरणातून चंद्रभागेत पाणी सोडले आहे. त्यामुळे आता आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो वारकऱ्यांना, चंद्रभागेमध्ये पवित्र स्नानाची अलौकिक पर्वणी साधता येणार आहे. मागील काही दिवस चंद्रभागेत असलेल्या घाणीमुळे, पाण्याला अतिशय दुर्गंधी वास येत होता. शिवाय लाखो वारकरी भक्त भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न आवासून उभा होता. पंढरपूर जिल्हा प्रशासनाने चंद्रभागेच्या नदीपात्रातील घाण काढून घेतल्याने व उजनी धरणातून मुबलक पाणी चंद्रभागे नदीमध्ये आल्याने, लाखो भक्त भाविक वारकऱ्यांना यावर्षी अलौकिक अशा स्नानाची पर्वणी साधता येणार आहे. दरम्यान हाती आलेल्या वृत्तानुसार आषाढी एकादशीची यात्रा संपतोपर्यंत उजनी धरणातून, रोज पाणी सोडले जाणार असून ,चंद्रभागा नदी ही पवित्र स्वच्छ ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top