जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क-
(कोल्हापूर प्रतिनिधी :मिलिंद पाटील.)
कोल्हापूर लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार देताना त्यांच्या नावाची गुप्तता पाळण्याबरोबरच त्यांच्या प्रलंबित कामाची शाश्वती लाचलुचपत विभाग घेणार असून, निर्भीडपणे नागरिकांनी या विभागाकडे योग्य त्या तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केले. तसेच या विभागामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रबोधनात्मक उपक्रमाबद्दल माहिती दिली.
लाचलुचपत विभागाकडून जिल्ह्यात प्रथमच असा उपक्रम राबवण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलातून काही महिन्यांपूर्वी सरदार नाळे यांची लाच लुचपत विभाग पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांनी या पुढील काळातही लाचलुचपत विभागाच्या वतीने कामकाजासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली.