जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे रयत क्रांती संघटनेचा नुकताच शेतकरी मेळावा पार पडला असून, या मेळाव्यात महाराष्ट्राचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी, देशी दारूच्या बाटली एवढी किमतीचा भाव, एक लिटर दुधाला द्यावा अशी अजब मागणी केली आहे. नुकतीच पुण्यामध्ये दुधाच्या प्रश्नावर, रयत क्रांती संघटनेने यात्रा काढली होती. त्यामुळे राज्याच्या दुग्धविकास मंत्रालयाने बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र राज्यात गायीच्या दुधाला प्रति लिटर 75 रुपये भाव मिळालाच पाहिजे व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 125 रुपये भाव मिळालाच पाहिजे अशी मागणी करून, सध्याच्या परिस्थितीत हे अवघड नसून, महागाई वगैरे या गोष्टीमुळे वाढत नाही, शिवाय शेतकऱ्याला जर दुधाला भाव योग्य दिला, तर महागाई निश्चितच कमी होईल. कारण शेतीवरती काम करणाऱ्या माणसाला, आपोआपच या गोष्टीचा फायदा होईल. शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल होण्यासाठी, सरकारने सकारात्मक निर्णय लवकर घ्यावेत. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी हा कष्टाळू व मायाळू आहे .राज्यातील शेतकऱ्याला जर तुम्ही झिडकारलं तर, शेतकऱ्यांच्या हातात बळी नांगर आहे, हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणांनी- राज्यकर्त्यांनी ,कधीही विसरू नये, असा सल्ला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.