जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीतील शास्त्री चौक ते अंकली (आदीसागर मंगल कार्यालयापर्यंत) कोल्हापूर रोड रस्ता चौपदरीकरणासाठी सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी,पुरवणी बजेटमध्ये 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे.सांगली बस स्थानक ते अंकलीपर्यंतच्या कोल्हापूर रोडवर, गेल्या काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने चर्चेत होता.वारंवार होत असलेल्या या रोडवर अपघाताने, बऱ्याच निष्पाप लोकांचा बळी गेला आहे व काही लोकांना अपंगत्वही आले आहे. सांगलीतील सर्वपक्षीय कृती समिती सांगली यांचे कडून, विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना,वरील सांगली बस स्थानक ते अंकलीपर्यंतच्या कोल्हापूर रोडला चौपदरीकरणासाठी निधी मंजूर करून घेण्याबद्दल मागणी व अवगत करण्यात आले होते.
सांगलीतील शास्त्री चौक ते अंकली पर्यंतचा कोल्हापूर रोड हा अतिशय मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा असून, सदर रोडवर फळ मार्केट, हॉटेल्स, वाहनाची शोरूम्स,भंगार बाजार ,काही शाळा व महाविद्यालय यामुळे वाहतुकीने गजबजलेला आहे. गेले काही वर्ष सांगलीतील शास्त्री चौक ते अंकली (कोल्हापूर रोड) हा विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेला असून ,सदरहू रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ही भूमीसंपदानाची प्रक्रिया पार पडलेली आहे ,शिवाय भूमी मालकांना त्याचा मोबदलाही देण्यात आला आहे. गेल्या मार्च 2023 च्या बजेटमध्ये, सदरहू शास्त्री चौक ते अंकली पर्यंतच्या रस्त्यासाठी कोणत्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नव्हती. सदरहू शास्त्री चौक ते अंकलीपर्यंतच्या कोल्हापूर रोडचे चौपदरीकरणाचे काम, पूर्ण क्षमतेने होण्यासाठी सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने, विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना निवेदन देण्यात येऊन प्रयत्न करण्यात आले होते. यास आज अखेर यश येऊन ,सदरच्या सांगलीच्या शास्त्री चौकापासून ते अंकलीपर्यंतच्या कोल्हापूर रोड ला सोबतही करण्यासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद, पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आली आहे. सांगलीतील शहरवासीयांनी शास्त्री चौक ते अंकलीपर्यंतच्या कोल्हापूर रोड चौपदरीकरणासाठी मंजूर झालेल्या पंचवीस कोटी रुपयांच्या निधीबद्दल विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांना धन्यवाद दिले आहेत.त्याचबरोबर सर्वपक्षीय कृती समितीचे देखील वरील प्रश्न लावून सोडवल्याबद्दल आभार मानले आहेत.