जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशातील काही भागात व राज्यांमध्ये मुसळधार ते असेच अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने नुकतीच वर्तवली असून, त्यामध्ये विदर्भ, गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र येथे पुढील 5 दिवसात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. देशातील ओडिसा, तेलंगणा ,गुजरात येथेही अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश राज्यातील भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
संपूर्ण कोकणात रेड अलर्ट जारी.
आज संपूर्ण कोकणात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी, गदगदीनदी, करली नदी इशारा पातळीच्या वरती दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हा प्रशासनाने नदीकडच्या गावाला व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे .कालच्या झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांना, जिल्हा प्रशासनाने पुनर्वसन केंद्रात दाखल केले आहे. तेरेखोल नदीला पाणी आल्यामुळे ,बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे हाल झाले आहेत. कुडाळ शहरात सुद्धा 3 फूट आलेले पाणी आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.
मुंबई व उपनगरात आज जोरदार पाऊस.
मुंबई व उपनगरात आज जोरदार पाऊस झाला असून, मात्र मुंबईत कुठेही सखल भागात पाणी साचल्याचे वृत्त नाही. मुंबई व उपनगरात होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे, लोकल व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येत असून, मुंबई व उपनगरातील सर्व लोकल्स 10 ते 15 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. मुंबईतील बऱ्याच ऑफिसेसना सुट्टी देण्यात आली असून ,काही नोकरदार कामावर देखील आलेले असल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तर नोकर वर्गाचे फार अतोनात हाल होतात.