जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत सांगली बंधारा बचाव कृती समितीच्या वतीने रविवार दि. 2/ 7/2023 रोजी, धरणातून आलेल्या पाण्याचे पूजन व बंधारा कृतज्ञता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सांगली बंधारा बचाव कृती समितीच्या वतीने, सदरहू कार्यक्रम रविवार दि. 2/ 7/ 2023 रोजी सकाळी 8:00 वाजता, स्थळ: सांगली बंधारा गावभाग सांगली येथे होणार असून, समस्त सांगलीकर नागरिकांना विनम्र आवाहन करण्यात आले आहे. मध्यंतरी सांगली बंधारा बचाव कृती समितीच्या वतीने, अखंड मानवी साखळीचे बंधारा वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते. सांगलीतील इतिहास कालीन असलेल्या बंधाऱ्याला फार मोठे महत्त्व असून, त्यामुळे सांगली शहरातील नागरिकांना बारा महिने पाण्याची सोय होत असते. सांगली बंधारा बचाव कृती समितीच्या वतीने, धरणातून आलेल्या नवीन पाण्याचे पूजन व बंधारा कृतज्ञता दिवस साजरा करत असताना, सदरहू कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व नागरिकांना प्रसाद वाटप करण्यात येणार आहे ,तरी सांगली शहरातील सर्व नागरिकांनी, सांगली बंधारा पूजन कार्यक्रमास उपस्थित राहून,प्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान पै. पृथ्वीराज पवार, संजय चव्हाण ,मोहन चोरमुले, रवींद्र जोशी सर, डॉ. चव्हाण ,मर्दा शेठजी बंधारा बचाव कृती समिती निमंत्रक यांनी केले आहे.