जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत आवश्यकतेपेक्षा जास्त ड्रायपोर्ट प्रकल्प असल्यामुळे ,यापुढे कोणत्याही नवीन प्रकल्पाला मान्यता मिळणार नसल्याचे, नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखरकर यांनी माहिती अधिकारात विचारलेल्या गोष्टीतून,जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने स्पष्ट केले आहे.यापूर्वी सांगली जिल्ह्यात रांजणी व सद्यस्थितीत सलगर येथे ड्रायपोर्ट प्रकल्प उभारण्याचे स्वप्न उभारले गेले होते.सदरहू जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट च्यावतीने स्पष्ट करण्यात आलेल्या बाबीवरून, सांगली जिल्ह्यातील सलगर येथील नवीन ड्रायपोर्ट प्रकल्प होणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे यापुढे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांसमोर, सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्यासमोर व जिल्ह्यातील सर्व आमदारांसमोर ,केंद्रीय सरकारी पातळीवर प्रयत्न करून ,सांगली साठी नवीन ड्रायपोर्ट प्रकल्प आणण्यासाठी, सर्व नियमावली बाजूला करून, प्रयत्न करावे लागतील.
दरम्यान सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी म्हटले आहे की, नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सलगरे येथे नवीन ड्रायपोर्ट प्रकल्प प्रस्तावित झाला असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या कडून दिलेल्या माहितीचा, जिल्ह्यातील प्रस्तावित असलेल्या सलगरे ड्रायपोर्ट नवीन प्रकल्पावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले असून, कोणत्याही परिस्थितीत सांगलीतील सलगरे येथील नवीन ड्रायपोर्ट प्रकल्प होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीत एकूण 9 ड्रायपोर्ट प्रकल्प अस्तित्वात आहेत.गेली बरीच वर्ष सांगलीतील ड्रायपोर्ट प्रकल्पावरून बरीच चर्चा चालू असून ,सांगलीतील महत्त्वकांक्षी असलेला सलगर येथील प्रस्तावित नवीन ड्रायपोर्ट प्रकल्प आणणे व सुरू करणे हे सध्य परिस्थितीत आव्हानात्मक असणार आहे.नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी माहिती अधिकारात, सद्यस्थितीत नवीन ट्रायपोर्ट बाबतीतली स्थिती जाणून घेण्यासाठी विचारलेल्या प्रश्नावरून, सदरहू जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. सन 2018 साली जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र सरकार यांच्यात यापूर्वी सामंजस्य करार झाला होता. दरम्यान सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी कोणत्याही स्थितीत सलगर येथील नवीन ड्रायपोर्ट प्रकल्पाचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.