जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील कोयना, राधानगरी, वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्यामुळे, धरणांच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसही बऱ्याच प्रमाणात झाला असून, सद्यस्थितीत कोयना धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 105.25 टीएमसी असून ,पाणीसाठा 22. 12 टीएमसी झाला आहे. वारणा धरणाची पाणी क्षमता 34.41 टीएमसी असून, धरणामध्ये सद्यस्थिती 13.70 टीएमसी पाणीसाठा झाला आहे .राधानगरी धरणाची पाणी साठ्याची क्षमता 8.36 असून सद्यस्थिती 3.35 टीएमसी पाणीसाठा झाला आहे .काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 25.41 टीएमसी असून, पाणीसाठा 3.72 टीएमसी झाला आहे.
आज सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार गगनबावडा तालुक्यातील कोदे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर, रुई ,तरवाड, सुर्वे, हळदी शिरोळ ,कोगे, इचलकरंजी येथील बंधारे ,सध्याच्या स्थितीत पाण्याखाली गेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीत पावसाची आवश्यकता असून, राज्यातील सर्व धरणे साठवण्याच्या क्षमतेपर्यंत भरल्यानंतर शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुलभ होण्यास मदत होईल.