जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी जवळपास 14 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज केले असून, महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत उमेदवारांकडून 145 कोटी रुपयांचा भरणा झाला आहे.महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण 19 हजार 460 जागांसाठी जवळपास 14 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज तयार केले असून, तुलनात्मक दृष्ट्या 1 जागेसाठी जवळपास 75 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या अभुतपूर्व भरतीसाठी, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 5 ऑगस्ट 2023 पासून 25 ऑगस्ट 2023 पर्यंत होती. आता यापुढे सर्व उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर,एक परीक्षा घेण्यात येईल. राज्यातील उमेदवारांची 14 लाख 51 हजार संख्या ही लक्षणीय असून, ही परीक्षा 1-2 दिवसात होणे अशक्य आहे. त्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये,राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल असे वृत्त आहे.
दरम्यान राज्यातील जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी 12 वी उत्तीर्ण परीक्षेची अट असली तरी, जवळपास बरेच उमेदवार हे पदवी व पदव्युत्तर पदवी व अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले आहेत. सध्य परिस्थितीत 20 दिवसांच्या कालावधीत जवळपास 14 लाखाच्या वर उमेदवारांनी अर्ज केले असल्यामुळे, परीक्षेनंतर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीच्या जागेची संख्या पाहता, उमेदवारांची संख्या ही लक्षणीय स्वरूपात झाली आहे. एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या 19460 जागांसाठी जवळपास 14 लाख 51 हजार उमेदवारांनी अर्ज केले असल्यामुळे, राज्यातील बेरोजगार असलेल्या युवकांच्याकडे संख्येकडे, राज्यातील जिल्हा परिषदेमधील भरती लक्ष वेधत आहे.