जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी किशोर तावडे यांची नियुक्ती झाली असून,त्यांनी आज आपल्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्त झालेले किशोर तावडे हे कोल्हापूरचे असून, आज त्यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला असून,त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, परीविक्षाधीन जिल्हाधिकारी विशाल खत्री,अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे,निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच महसूल विभागाचे अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झालेले श्रीयुत किशोर तावडे यापूर्वी, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असून, त्यांनी आपल्या कारकिर्दीचा जून 1995 पासून, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी (रत्नागिरी) पदापासून सुरुवात करुन,आत्तापर्यंत यांनी जिल्हा पुरवठा (रत्नागिरी),अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी( जव्हार, ठाणे),उपविभागीय अधिकारी( चिपळूण), निवासी उपजिल्हाधिकारी (रत्नागिरी),प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ,(कोल्हापूर),सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय,कोकण भवन (नवी मुंबई), निवासी उपजिल्हाधिकारी (सांगली),अप्पर जिल्हाधिकारी (सिंधुदुर्ग),अप्पर जिल्हाधिकारी (पालघर मुख्यालय जव्हार), विशेष कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (सिडको नवी मुंबई) आणि आत्ता सध्या व्यवस्थापकीय संचालक शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित (मुंबई) या पदावरून बदली होऊन त्यांनी आज, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतला आहे.