जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारामुळे अचानक दहा तासात 18 जणांचा मृत्यू होऊन, मृतांमध्ये 18 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे ,शिवाय त्यामध्ये एक चार वर्षीय मुलाचा समावेश आहे. ठाण्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची चिन्ह दिसत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात क्षमतेपेक्षा जादा रुग्ण दाखल होत असल्याने उपचार करणे शक्य झाले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. सध्य परिस्थितीत अति दक्षता विभागात 40 बेड मागे 2 नर्स व 1 डॉक्टर असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. काल रात्री 10:30 ते सकाळी 8:30 वाजेपर्यंत ही घटना घडली असून, त्यात एकूण 18 जणांचा 10 तासात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील कळवा येथील घटना दुःखददायी असून, खुद्द मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले आहे ,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान रुग्णाच्या जीविताशी खेळणाऱ्या खात्याच्या कर्मचाऱ्यावर,योग्य ती कारवाई राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने केली जाणार असून,यासाठी चौकशी समितीचा अहवाल अपेक्षित आहे. घटना कुठे घडली? यापेक्षाही रुग्णांचे जीव गेले हे जास्त दुःखद आहे. शासनाच्या वतीने योग्य ती जबाबदारी घेतली आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.एकूण झालेल्या 18 मृत्यूंमध्ये, भिवंडी शहरातील 11 रुग्णांचा समावेश आहे. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात, विविध आजारांखाली उपचार घेत असलेल्या मृतांचे वय 33 ते 83 वयोगटातील असल्याचे समजते. दरम्यान राज्याच्या आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून अहवाल आल्यानंतर कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले आहे,तसेच सदरहू घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.