जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत,जी-20 परिषदेसाठी, ऐतिहासिक अभूतपूर्व तयारी झाली आहे.40 देशांच्या राष्ट्रप्रमुखासह विविध देशातील संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असून, दि.9 सप्टेंबर 2023 व दि.10 सप्टेंबर 2023 रोजी च्या कालावधीत ही परिषद दिल्लीमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-20 परिषदेमध्ये,राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्रप्रमुखांच्या वतीने उपस्थित राहणारे परराष्ट्रमंत्री किंवा तत्सम अधिकारी यांच्या सोयी- सुविधेसाठी जय्यत तयारी झाली असून,त्यात कोणतीही कसर राहू नये अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.
देशाच्या राजधानी दिल्लीत जी- 20 परिषदेच्या साठी उपस्थित राहणाऱ्या राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेसाठी,विविध हॉटेल्स व जाण्या- येण्याच्या मार्गावर,विशेष सुरक्षा कमांडोपथके तैनात करण्यात आली असून,वैद्यकीय सुविधा देणाऱ्या संबंधित रुग्णालयांना, 24 तास ॲलर्ट मोडवर ठेवण्यात आलेले आहे.भारताची राजधानी असलेल्या दिल्लीत जी- 20 परिषदेच्या परिसरामध्ये,अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले असून,जाण्या-येण्याच्या मार्गावर विविध जातींच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. केंद्रीय प्रशासनाने जी- 20 परिषदेसाठी अभूतपूर्व असा बंदोबस्त ठेवला असून,भारताच्या दिल्लीच्या राजधानीत होत असलेली जी- 20 परिषदेला विशेष अर्थाने महत्त्व प्राप्त झाले आहे. देशभरातील येणाऱ्या राष्ट्रप्रमुख व तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या येण्यामुळे,दिल्लीतील जवळपास विविध कंपन्यांची 160 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एकंदरीतच भारतामध्ये होत असलेल्या जी- 20 परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर व विविध समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.