भारताची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरावयाची विश्वविक्रमी चांद्रयान -3 ची मोहीम, येत्या 23 ऑगस्टला संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी यशस्वीपणे पूर्ण होणार.!

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

भारताचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे चांद्रयान -3, हे येत्या 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी उतरणार असल्याचे समजले आहे.चांद्रयान -3 मोहिमेच्या लँडर मॉडेलचा दुसरी डी ऑर्बिटिंगचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे.भारताचे चंद्रयान -3 हे चंद्राच्या जवळपास 25 किलोमीटर किमान व कमाल 134 किलोमीटर च्या अंतरावर फिरत आहे.भारताची चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची चांद्रयान -3 मोहीम,23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी पूर्ण होणार आहे.

 भारतीय नागरिकांना या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचे चांद्रयान -3 चे प्रक्षेपण, 23 ऑगस्टला संध्याकाळी 05 वाजून 27 मिनिटांनी सुरू होणार आहे.भारतीय इस्रोच्या अधिकृत youtube वाहिनी, फेसबुक पेज, डीडी नेशनल व राष्ट्रीय दूरचित्रवाणी वरून याचे थेट प्रक्षेपण,भारतीय नागरिकांना पाहता येईल असे इस्त्रोने कळवले आहे.एकंदरीतच विश्वविक्रमी असलेली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी चांद्रयान -3 च्या मोहिमेकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे. संपूर्ण जगाचे लक्ष,भारताच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणाऱ्या चांद्रयान -3 च्या मोहिमेकडे, अंतराळातील चंद्राच्या भूमीवरील संशोधनात्मक शास्त्रीय गुढ उलगडणार्‍या गोष्टींकडे लागले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top