जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मा.जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजय बजाज साहेब व युवक शहरजिल्हा अध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीराअंतर्गत आज १० जणांची मोतिबिंदू आँपरेशनची ९५ वी बँच पार पडली, सदरचे मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.
यावेळी पेशंटच्या भेटप्रसंगी,मा.नगरसेविका स्नेहल सावंत, मा.नगरसेविका नसीमा नाईक, राष्ट्रवादीचे कुपवाड शहर अध्यक्ष मा.तानाजी गडदे, राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव मा.ज्योती अदाटे ,मा. रज्जाक नाईक ,मा.उमर गवंडी, मा.प्रियांका तुपलोंढे, मा.मुन्ना शेख, मा. युसूफ जमादार,डॉ शुभम जाधव, मा.शाहरुख सनदी ,मा.रोहित आठवले आदी उपस्थित होते. या कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हा अध्यक्ष डॉ. शुभम जाधव,निलेश शहा,रोहित आठवले,अजीम मुल्ला यांनी केला.