जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने नुकताच कांद्याच्या निर्यातीवर 40% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असून, देशात कांद्याची मुबलक उपलब्धता व्हावी हा उद्देश असल्याचे समजते. देशाच्या दक्षिणेकडील भागातून उत्पादन घेत असलेल्या गुलाबी कांद्यावर देखील, 50% आयात शुल्क लागू केले असून, देशात सर्वत्र कांद्याचा मुबलक पुरवठा- उपलब्धता व्हावी हा उद्देश लक्षात घेऊन,तत्काळ प्रभावाने वरील निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षीच्या अखेरपर्यंत सदरहू कांदा निर्यातीवर आयात शुल्क आकारण्याचा निर्णय, प्रभावाने लागू राहणार असून, राज्यातील कांदा उत्पादकांच्या संघटनेने मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेच्या मतानुसार गेल्या ८ महिन्यात कांद्याला दर चांगला मिळाला नसला तरी,त्यावेळी केंद्र सरकारने कोणतीही मदत शेतकऱ्यांना केली गेली नाही, मात्र आता कांद्याच्या दरात वाढ व्हायला लागल्यानंतर, निर्यात शुल्क लावण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय,अतिशय अन्यायकारक असल्याचे राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी म्हटले आहे. दरम्यान राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी,केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर,राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा दिला आहे.