जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने कांद्याचा राखीव साठ्याची मर्यादा 5 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला असून, केंद्र सरकारने सुरुवातीला 3 लाख मॅट्रिक टनापर्यंत, खरेदीचे उद्दिष्ट प्राथमिक स्वरूपात ठेवले होते.त्यानंतर मात्र आज नवा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, राखीव साठ्याची कांद्याची मर्यादा 5 लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारचे नवे राखीव कांद्याचा साठा करण्याचे धोरण अमलात आणण्यासाठी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने, राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ आणि राष्ट्रीय सहकारी कृषी विपणन संघाला, प्रत्येकी 1 लाख टन कांदा खरेदीचे आदेश दिले आहेत.
देशभरातील कांद्याच्या किरकोळ किंमतीचे भाव,राष्ट्रीय सरासरीपेक्षा व आधीच्या महिन्यापेक्षा जास्त असल्यामुळे, राखीव साठा मधून बाजारपेठेमध्ये कांद्याची विक्री सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत बाजारपेठेत, 1400 मेट्रिक टन इतक्या कांद्याचा पुरवठा करण्यात आला असल्याचे, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार अतिरिक्त साठ्यातून,राष्ट्रीय सहकार संघाची फिरती वाहने ही, कांदा किरकोळ विक्रीसाठी वापरली जाणार असून,ग्राहकांना प्रति किलो 25 रुपये या दराने कांद्याची विक्री केली जाणार असून,ही विक्री उद्यापासून सुरू होईल असेही ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कळवले आहे.