जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अजित निंबाळकर)
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज देशभरात, ठिकठिकाणी जयंती साजरी होऊन, सद्भावना दिवस म्हणून साजरा केला गेला. देशाचे सातवे प्रधानमंत्री म्हणून 1984 ते 1989 या काळात त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर वरून, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना आदरांजली वाहिली आहे. देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची आज जयंती, देशभरात विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली.
नवी दिल्लीतील राजीव गांधी समाधी स्थळ वीरभूमी येथे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, मुलगी प्रियांका गांधी यांनी जाऊन आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर वरून "बाबा,तुम्ही सोडून गेलेल्या मार्गाच्या खुणा, हाच माझा मार्ग असून, मी प्रत्येक भारतीयांचा संघर्ष व स्वप्ने समजून घेत आहे, भारतीयांचा आवाज ऐकत आहे ,"अशा भावना व्यक्त केल्या आहेत. आज देशभरात ठिकठिकाणी, भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती, विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली.