जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
देशातील प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन आता भक्त भाविकांना,पितळी उंबरा ओलांडून आतून घेता येणार असल्याचे घोषणा राज्याचे मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.आज मंगळवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून,देवीभक्त भाविकांना हा एक दर्शनासाठी दिलेला नजराणा आहे.कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मंदिर परिसरातील भाविकांसाठी उभारलेल्या स्वच्छतागृह,चप्पल स्टॅन्ड सुविधा केंद्राच्या उद्घाटनासाठी, जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापुरात आले होते, त्यावेळी त्यांनी वरील घोषणा केली आहे.
कोरोना कालखंडापासून गेले काही दिवस,देशातील व महाराष्ट्रातील देवीभक्त भाविकांना अंबाबाईचे दर्शन,पितळी उंबरा ओलांडून घेता येत नव्हते.गेले काही दिवस राज्यातील देवी भक्त भाविकांनी व प्रसार माध्यमांनी सुद्धा यासाठी मागणी केली होती.दरम्यान राज्यातील देवीभक्त भाविकांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून,हा एक उत्साहवर्धजनक निर्णय असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटल्याचे दिसून येत आहे.फक्त गर्दीचे दिवस सोडून व करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवरात्रीचे गर्दीचे दिवस सोडून,इतर दिवशी हा अमूल्य दर्शनाचा मेवा श्री देवी भक्त भाविकांना मिळणार आहे. एकंदरीतच या निर्णयामुळे सर्व देवीभक्त भाविकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.