कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे हद्दीत,जैन बोर्डिंग ट्रॅफिक ऑफिस जवळ ,बेबो नासा रवथम या अनोळखी इसमाच्या आकस्मित मृत्यूची नोंद.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अजित निंबाळकर)

कोल्हापूर येथे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, जैन बोर्डिंग ट्रॅफिक ऑफिस जवळ आज, बेबो नासा रवथम वय वर्षे अंदाजे 40,(पूर्ण पत्ता माहित नाही) या अनोळखी इसमाचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

 कोल्हापुरातील जैन बोर्डिंग ट्रॅफिक ऑफिस जवळ बेशुद्ध अवस्थेत एक इसम मिळून आल्याने,त्यास दि. 20/ 4/ 2023 रोजी सायंकाळी 04 वाजून 34 मिनिटांनी, सी.पी.आर.रुग्णालय कोल्हापूर येथे उपचाराकरिता नेले असता,डॉक्टरांनी तपासले असता मयत म्हणून घोषित केले आहे. सदरहू मयत इसम बेबो नासा रवथम वय वर्षे अंदाजे 40 याची, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद, डॉ.प्रथमेश पाटील सी.एम.ओ.,सी.पी.आर.हॉस्पिटल कोल्हापूर यानी दिली आहे. कोल्हापूर येथील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू 37/ 2023 सी.आर.पी.सी.-174 प्रमाणे गुन्हा नोंद असून, मयत इसमाचा अधिक पोलीस तपास सुरू आहे. कोल्हापूर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक व्ही.एस.कोळेकर यांचेकडून अधिक पोलीस तपास सुरू असून,वरील मयत इसम बेबो नासा रवथम वय वर्षे अंदाजे 40 वर्षे, (पूर्ण पत्ता माहीत नाही)यांच्या संबंधित नातेवाईकांनी, कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top