जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नाशिक शिक्षक समन्वय संघाचा,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शिक्षकांचा बैठक मेळावा,"चाळीसगाव" येथे 01 ऑक्टोबर 2023 वार रविवार रोजी होणार आहे.ना कुणा व्यक्तीसाठी,ना कुणा संघटनेसाठी एकदा पुन्हा संघर्ष करूया स्वतच्या हक्काच्या भाकरीसाठी.समन्वय संघाने जेंव्हा जेंव्हा आंदोलन केली त्यास यश निश्चित प्राप्त झालं आहे.परिणामी समाधान ह्याच गोष्टीचे आहे की आज महाराष्ट्रात विना वेतन कुणीच नाहीय.फुल ना फुलाची पाकळी तरी वेतन रूपाने मिळत आहे.माय बाप सरकारने आपली मागणी काही अंशी पूर्ण केली.पुढील अनुदान टप्प्यासाठी 5500 कोटीची तरतूद बाबत सूतोवाच केलेले आहे.रात्र वैऱ्याची आहे.आपण गाफील राहता कामा नये.समन्वय संघाला पूर्ण विश्वास आहे की शिंदे सरकार आपले वचन नक्की पूर्ण करेल.पण त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा त्याच जोमाने वाढीव ताकदीने पण संविधानिक मार्गाने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करावे लागेल.
राज्यातील शिक्षकांचा शिक्षक समन्वय संघ यांवर अतूट विश्वास,अपेक्षा आहेत.अजूनही अंशतः अनुदानित शिक्षकांचे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत.ह्या सर्वांचे उत्तर एवं 100% वेतन अनुदान ह्याच मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्या हेतूने दि.19 सप्टेंबर रोजी संत नगरी शेगाव येथे समन्वय संघाची बैठक झाली. ह्याच बैठकीत 30 ऑक्टोबर 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे अंतिम निर्णय घेण्यात आला.त्याच अनुषंगाने नाशिक विभाग शिक्षक समन्वय संघाची (नाशिक,जळगाव,धुळे आणि नंदुरबार) प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची बैठक(मेळावा) चारही जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे दि.1 ऑक्टोबर वार रविवार रोजी सकाळी 11 वाजता आयोजित केलेली आहे.तरी सर्व लाभार्थी शिक्षक बंधू आणि भगिनीं यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नाशिक विभागाची ताकद वाढवायची आहे.कृपया आपल्या शाळेतील सर्व सहकारी शिक्षक,आजूबाजूच्या शाळेतील शिक्षक या सर्वांना सूचित करून अग्रक्रमाने आवाहन करावे.ही विनंती.
स्थळ- भूषण मंगल कार्यालय,भडगाव रोड,चाळीसगाव जि- जळगाव.
सकाळी 11 वाजता.
दि.-1ऑक्टोबर 2023.
आयोजक शिक्षक समन्वय संघ,नाशिक विभाग.