जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी "वंदे भारत एक्सप्रेस" रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न चालू असून,2 महिन्यात रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे,खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले आहे.कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी," वंदे भारत एक्सप्रेस" ला जवळपास 7 तासांचा अवधी लागणार असून, "वंदे भारत एक्सप्रेस" चालू झाल्यास, कोल्हापूर ,सांगली, सातारा या जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना विशेषतः फार मोठा फायदा होणार आहे.
संभावित असलेल्या कोल्हापूर ते मुंबई "वंदे भारत एक्सप्रेस"चे संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे. सध्य परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर ते मुंबई "वंदे भारत एक्सप्रेस"साठी लागणाऱ्या,हातकणंगले ते मिरज दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या मजबुतीकरणावर भर दिला आहे.कोल्हापुरातून मुंबईला वंदे भारत रेल्वे एक्सप्रेस सुरू होण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी,केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी व पाठपुरावा केला आहे.कोल्हापुरातून मुंबईला जर "वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे" सुरुवात झाली तर, त्याचा थेट फायदा कोल्हापूर,सांगली व सातारा या तीन जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना होणार असून,रेल्वे प्रशासनाच्या दृष्टीने देखील आर्थिक उद्दिष्ट साध्य होण्याची चिन्हे दिसत आहेत.मुंबई व आसपासच्या ठिकाणातून कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनास पर्यटक हे 12 महिने येत असतात.एकंदरीतच संभावित असलेली कोल्हापूर ते मुंबई "वंदे भारत एक्सप्रेस "जर 2 महिन्यात चालू झाली तर निश्चितच,कोल्हापूर,मिरज,सांगली,सातारा,पुणे,ठाणे,मुंबई ठिकाणच्या रेल्वे प्रवाशांची फारच मोठी सोय होणार आहे.
संभावित असलेल्या कोल्हापूर ते मुंबई "वंदे भारत रेल्वे एक्सप्रेसचे "संभावित वेळापत्रक खालील प्रमाणे.-
कोल्हापुरातून "वंदे भारत एक्सप्रेस" संभावित असलेल्या वेळापत्रकानुसार पहाटे 5:50 वाजता सुटून,मिरज येथे 6:18 मिनिटांनी पोचून पुढे,सांगली,सातारा,पुणे,कल्याण,ठाणे व शेवटी ती सीटीएस मुंबई रेल्वे स्थानक येथे 12:56 मिनिटांनी पोहोचेल.
मुंबई सीटीएस रेल्वे स्थानकावरून सायंकाळी 5:03 मिनिटांनी सुटून,ठाणे,कल्याण,पुणे,सातारा,सांगली,मिरज येथे 11:45 वाजता व शेवटी कोल्हापुरात 11:55 पर्यंत पोहोचेल.