जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
हळदी कुंकू कार्यक्रम ठिकाणी अयोध्येतील श्रीराम मंदिर, आणि केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती,याचे विशेष आकर्षण होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षणाचा निर्णय घेतल्यामुळे, देशातील समस्त महिलांना सोनेरी दिवस येतील.हा निर्णय म्हणजे एक सोनेरी क्षण असल्याचे मत ज्योतीताई संजयकाका पाटील यांनी व्यक्त केले.या आरक्षणाच्या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
चिंचणी ता.तासगाव येथे गौरी- गणपती निमित्ताने सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांच्या निवासस्थानी,सांगली जिल्ह्यातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ज्योतीताई पाटील बोलत होत्या त्या म्हणाल्या की, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने, गेल्या नऊ वर्षांमध्ये महिलांसाठी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.त्यात प्रामुख्याने उज्वला गॅस योजना याचा विशेष उल्लेख करावा लागेल.या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबातील महिलांना मोठा आधार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता,तसेच आगामी काळात देशातील 75 लाख कुटुंबाला उज्वला गॅस योजनेतून आणखी लाभ देण्यात येणार आहे.आयुष्यमान भारत या योजनेमुळे आरोग्य व पंतप्रधान आवास योजना या योजनेमुळे कोट्यावधी कुटुंबांतील महिलांच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल घडला आहे.आता नुकताच घेतलेल्या महिला आरक्षणाच्या निर्णयामुळे महिलांच्या जीवनामध्ये या क्रांतिकारी निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.त्यामुळे महिला आरक्षण मिळाल्यामुळे सर्व स्तरात प्रगती करणाऱ्या महिला आता,पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.
हळदी कुंकू हा कार्यक्रम खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योतिकाकी संजयकाका पाटील,तासगाव कवठेमहांकाळ विधानसभेचे प्रमुख प्रभाकरबाबा पाटील यांच्या पत्नी शिवानी प्रभाकर पाटील यांच्या संकल्पनेतून, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे घेण्यात आला.या कार्यक्रमाला सांगली लोकसभा क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्व उपस्थित महिलांचे हळदीकुंकू ज्योतीकाकी संजयकाका पाटील व डॉ.शिवानी पाटील यांनी केले.