जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील सावळज गावासह 8 गावांना विस्तारित टेंभू योजनेत प्रशासकीय मान्यता देऊन समावेश करावा,यासाठी 2 ऑक्टोबर 2023 रोजीच्या गांधी जयंती पासून,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.आमदार सुमन ताई पाटील यांच्याबरोबर आमरण उपोषणास सावळजसह 8 गावातील शेतकरी वर्ग सहभागी होणार आहे.त्या संबंधातील निवेदन जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत टेंभू उपसासिंचन योजना हा प्रकल्प कार्यान्वित असून,कराड जवळील कृष्णा नदीवर टेंभू गावाजवळ बंधारा बांधून,विविध टप्प्यातद्वारे 22 टीएमसी पाणी उचलून, सांगली,सोलापूर,सातारा जिल्ह्यातील एकूण 7 तालुक्यांसाठी 80472 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणे प्रस्तावित होते,परंतु उंचावरील काही क्षेत्र टेंभू सिंचन प्रकल्पालगत असून,गेली अनेक वर्ष या भागाला पाणी मिळत नसल्याने,लोकप्रतिनिधी या नात्याने सातत्याने शासनाशी पाठपुरावा केला आहे.माझ्या तासगाव कवठेमंकाळ क्षेत्रातील दुष्काळाचा सामना करत असलेल्या,सावळज,सिद्धेवाडी,दहिवडी,जरंडी,वायफळे, यमगरवाडी,बिरणवाडी आणि डोंगरसोनी आदी 8 गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत.
शासनस्तरावर मी स्वतः यापूर्वी तत्कालीन मंत्री महोदयांना 8 ही गावांचा टेंभू योजनेत समावेश होऊन, हक्काचे पाणी मिळण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. महाराष्ट्र शासनाचे पत्र जावक क्रमांक 2021(216/2021) दि. 29/ 4/ 2022 नुसार 8 टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 343 गावांना,1 लाख 21 हजार 473 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार असून, टेंभू योजनेचा तृतीय सु.प्र.मा. अहवाल सादर झालेला आहे. त्याच्या मंजुरीनंतर उर्वरित गावांचा समावेश करून, वंचित राहिलेल्या सर्व गावांना हक्काचे पाणी देण्यासाठी, 7210 कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. शासनाकडे तृतीय सु.प्र.मा. अहवाल प्रलंबित असून, सावळसह 8 गावांचा प्रलंबित असलेल्या तृतीय सु.प्र.मा. अहवालास मान्यता त्वरित मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
महाराष्ट्र शासन जोपर्यंत विस्तारित टेंभू योजनेचा तृतीय सुप्रभा अहवाल पारित करणार नाही, तोपर्यंत माझे आमरण उपोषण चालू राहणार असून,युवा नेते रोहित पाटील हे सुद्धा माझेसोबत उपोषणास बसणार आहेत.जोपर्यंत विस्तारीत टेंभू योजनेचा शासन स्तरावर अधिकृत समावेश होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा इशारा युवा नेते रोहित पाटील यांनी दिला आहे.