जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीतील बुधगाव गावामध्ये अनंत चतुर्दशीच्या दिवशी विठ्ठल चौक गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक, अतिशय उत्साहात,शिस्तबद्ध संयोजनरित्या पार पडली आहे. आज अनंत चतुर्थीच्या दिवशी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ए.पी.आय.स्मिता पाटील यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची आरती करून,विसर्जन मिरवणूकीस सुरूवात झाली. आज झालेल्या श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत,बुधगाव गावातील गणेश भक्तांचा व महिला वर्ग गणेश भक्तांचा फार मोठा सहभाग होता.
बुधगाव गावातील आजच्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी विठ्ठल चौक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत,पारंपारिक वाद्यांच्यावर भर देण्यात आला होता.बुधगाव गावातील श्री विठ्ठल चौक गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे 31 वे वर्ष असून, मिरवणुकीत ढोल ताशांची पथके,वाद्यांची पथके,सुंदर अशा नयन मनोहर आरास केलेल्या वाहनावर विराजमान झालेली श्री गणेश मूर्ती आदी गोष्टी वैशिष्ट्यपूर्ण लक्षवेधक संस्मरणीय ठरल्या आहेत.बुधगाव गावातील गणेशोत्सव काळातील कायदा व सुव्यवस्थास्थिती व्यवस्थित राहण्यासाठी,काही दिवस सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या एपीआय स्मिता पाटील मॅडम यांनी दिलेले योगदान विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल.सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ए.पी.आय.स्मिता पाटील मॅडम यांचा,त्यांनी दिलेल्या गणेशोत्सव काळातील योगदानाबद्दल, पंचायत समितीच्या माजी उपसभापती तृप्ती कुलदीप पाटील, माजी सरपंच सुजाता सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला असून,एक कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून त्यांनी गणेशोत्सव काळातील केलेल्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
आज झालेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीबद्दल,बुधगाव मधील श्रीकांत यमगर,राष्ट्रीय पत्रकार संघटना पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी,सर्व पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी,उपस्थित असलेल्या गणेश भक्तांचे व गणेश भक्त महिला वर्गांचे आभार मानले आहेत.आजची अनंत चतुर्दशीच्या दिवशी झालेली बुधगाव मधील विठ्ठल चौक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक,अतिशय संस्मरणीय, लक्षवेधक ठरली आहे.