जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी: अजित निंबाळकर)
दि:८/९/१० कोल्हापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने होणाऱ्या सिंथेटिक ट्रॅक छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत गोळाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये गौरी धर्मेंद्र बगाडे,ज्योतिर्लिंग विद्यामंदिर निगवे दुमाला हिने 14 वर्षाखालील वयोगटात जिल्ह्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.त्यामुळे तिची राज्यस्तरीय चिपळूण येथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गौरीला मुख्याध्यापक सातपुते सर,तसेच क्रीडा शिक्षक डॉ.अभय कुमार पाटील सर,पी.बी.पाटील सर व शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.