क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य क्रीडाशिक्षक विशेष गुणगौरव पुरस्कारांने शिवाजी पाटील सन्मानित.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(प्रतिनिधी: अजित निंबाळकर)

मांगोली ता.राधानगरी येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्म.घरात शैक्षणिक वातावरण तसे सर्वसामान्य असताना इयत्ता सातवीत असताना आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला सुरुवात केली. बी.ए. बी. पी. एड. शैक्षणिक अर्हता धारण केल्यानंतर १९९९ साली डी.सी.नरके विद्यानिकेतन कुडित्रे येथे व्हॉलीबॉल प्रशिक्षक व वस्तीगृह सहाय्यक म्हणून नोकरीला सुरुवात केली. 2000 साली आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज मिणचे ता.हातकणंगले येथे क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले. संस्थापक प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे सचिव एम. ए. परीट यांच्या मार्गदर्शनाखाली 2001 ते 2005 या कालावधीत शाळेमध्ये व्हॉलीबॉल खेळ रुजवला, त्या काळात पन्हाळा, कुरुंदवाड, गारगोटी, बाचणी यासारख्या मातब्बर असणाऱ्या संघांना हरवणे सोपी गोष्ट नसताना 2005 सालापासून 2013 सालापर्यंत सातत्याने विद्यालयातील संघ शालेय स्पर्धेत राज्यस्तरापर्यंत उज्वल यश संपादन करत गेले. एकाच शाळेचे 14 वर्षाखालील 17 वर्षाखालील व 16 वर्षाखालील ग्रामीण राज्यस्तरीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावणारी महाराष्ट्रातील एकमेव शाळा असा बहुमान विद्यालयाला मिळवून दिला. एकाच वर्षी तब्बल 14 शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू विद्यालयामध्ये घडवता आले. शाळेतील क्रीडा विभागाचे धुरा सांभाळत असताना विविध १४ खेळातून 2781 पेक्षा अधिक राज्यस्तरीय 487 राष्ट्रीय व 17 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले. शाळेच्या क्रीडा यशाची दाखल घेत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सातत्याने पाच वर्ष क्रीडा प्रोत्साहन पर अनुदान मिळवणारे शाळा म्हणून शाळेचा उल्लेख केला जातो.क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम करत असतानाच पाटील सर महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघटनेवर उपाध्यक्ष विभागीय सचिव तसेच राष्ट्रीय स्पर्धेत करिता निवड समिती सदस्य म्हणून सातत्याने काम करत आले आहेत.राज्यस्तरावर तज्ञ क्रीडा मार्गदर्शक मुख्याध्यापक संघाच्या शारीरिक शिक्षण समितीवर अभ्यास समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण क्रीडा महा संघावर राज्यस्तरीय समन्वयक म्हणून काम करत आहेत. 

1) राष्ट्रीय प्रशिक्षक व्हॉलीबॉल,नेटबॉल, थ्रोबॉल

2) शासकीय शालेय क्रीड़ा स्पर्धा प्रमुख हातकणंगले तालूका

4) क्रीडा क्षेत्रात आजपर्यंत घडवलेले खेळाडू.

   जिल्हास्तर :   4557

   विभागस्तर :   3667

   राज्यस्तर   :    2781

   राष्ट्रीय       :     423

   आंतरराष्ट्रीय :   17

5) एकुण ४ क्रीडा पुस्तकांचे लेखक, क्रीडा व्याखाते, व निवेदक.

6) क्रीडा पत्रकार व विश्लेषक.

7) विविध क्रीडा संघटनावर पदाधिकारी म्हणून कार्यरत.

 महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय कार्यालयामध्ये खेळाडू आरक्षणामधून एकूण 87 खेळाडू क्लासवन ते क्लास फोर या पदावर रुजू झाले आहेत.पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामधून एक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू ही घडला आहे. क्रीडा क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यातही पाटील सर नेहमी अग्रेसर असतात. कोरोना काळामध्ये लोकांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सक्रिय सहभाग घेतला. त्यासोबत महापुरामध्ये अन्नधान्य व कापडाच्या स्वरूपात सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्रीडा मंडळ यांना व शाळांना राज्य संघटनेच्या मार्फत क्रीडा साहित्य पूर्ण पुरवण्यामध्ये सरांचा सक्रिय सहभाग आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top