जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
सार्वजनिक गणेशमुर्ती विसर्जन मुख्य मार्ग शाहु पुतळा - शिवतीर्थ जनता चौक-गांधी पुतळा झेंडा चौक-मरगुबाई मंदिर चौक ते नदी घाट असा आहे.
वाहतुकीसाठी बंद व चालु केलेले मार्ग खालील प्रमाणे.
1) सांगली कडुन इचलकरंजी शहरात येणाऱ्या वाहनांसाठी झेंडा चौक-गांधी पुतळा-जनता चौक- हवामहल बंगला-शिवतीर्थ कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व एसटी बसेसला बंदी घालण्यात येत आहे.सर्व प्रकारची वाहतुक सांगली नाका येथुन फॉर्च्युन प्लाझा-लालनगर-थोरात चौक-डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने एसटी स्टँड व शाहु पुतळ्याकडे येतील व त्याच मार्गाने परत जातील.
2) कुरुंदवाड,हुपरी,कागल,निपाणी व कर्नाटकातुन येणारी सर्व प्रकारची वाहतुक ही पंचगंगा पुल येथुन इचलकंरजी शहरात येण्यास बंदी घालण्यात येत आहे त्यांना पर्यायी मार्ग पट्टणकोडोली- इंगळी,रुई पुल-कबनूर मार्गे येतील व त्याच मार्गाने परत जातील.तसेच कुरुंदवाड,बोरगांव व कर्नाटकातुन इचलकरंजी कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अब्दुललाट-हेरवाड-कुरुंदवाड-शिरढोण टाकवडे-महासत्ता चौक-थोरात चौक-आंबेडकर पुतळा मार्गे इचलकंरजी शहरात येतील व त्याच मार्गाने परत जातील.
3) शिवतीर्थ,जनता चौक,गांधी पुतळा नारायण टॉकी,झेंडा चौक,फडणीस हौद,गुजरी पेठ चौक,मरगुबाई मंदिर चौक या गणपती विसर्जन मार्गास जोडणाऱ्या सर्व पोट रस्त्यावरुन येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य विसर्जन मार्गावर येण्यास व वाहन पार्कींग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
वरील सर्व मार्ग गुरुवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते सार्वजनिक गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद व खुले करण्यात येत आहेत.