जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
फायनान्शियल मॅनेजमेंट ऑफ डॉक्टर या विषयावर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन कोल्हापूर व एस पी वेल्थ मॅनेजमेंट यांच्यामार्फत कार्यशाळा घेण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
केएमए हॉल,मंगळवार पेठ येथे झालेल्या या कार्यशाळेत अनिल पाटील यांनी आर्थिक साक्षरता आणि पैशाचे व्यवस्थापन कसे करावे, त्याचबरोबर गुंतवणुकीच्या अनेक पर्यायाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. भारताची अर्थव्यवस्था जोमाने प्रगती करीत असताना तसेच भांडवली बाजारात गुंतवणूक करणे गरजेचे आहे.बाजाराची जोखीम समजावून योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करावी,याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विजय ककडे यांनी डॉक्टरांचे आर्थिक नियोजन व मोबाईलवरून होणार्या आर्थिक फसवणुकीबद्दलची माहिती तसेच संभाव्य धोके याबद्दल मार्गदर्शन केले. भाजपच्या महिला अध्यक्ष सौ. रूपाराणी संग्रामसिंह निकम उपस्थित होत्या. अध्यक्ष डॉ. राजेश सातपुते यांच्या हस्ते सौ. निकम यांचा सत्कार केला. सभासदांच्या गुंतवणुकीसंदर्भातील विविध शंकांचे निरसन श्री. पाटील व डॉ. ककडे यांनी केले. आर्थिक गुंतवणुकीवर भविष्यात होणारे परिणाम, अडीअडचणी व पर्याय यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी डॉ. अरुण धुमाळे , डॉ. दीपक पवार, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पूजा पाटील, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. शिवाजी मगदूम, तसेच सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन करून डॉ. हरीश नांगरे यांनी आभार मानले.