कोल्हापुरात व सांगलीत श्री गणरायाचे उत्साहात आगमन.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

कोल्हापुरात- आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यात, लवाज्यासह पारंपारिक पद्धतीने,न्यू पॅलेस मध्ये श्री गणरायाचे आगमन झाले.कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्यात विधीपूर्वक,श्री गणरायाची उत्साहात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कोल्हापुरात शाहूपुरी, कुंभार गल्ली, गंगावेस बापट कॅम्प व इतर भागात श्री गणरायाच्या मूर्ती मंडळात व घरी नेण्यासाठी श्री गणेश भक्तनी एकच गर्दी केली होती. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने व जिल्हा पोलीस दलाच्या वतीने योग्य ते चोख नियोजन केले असून, ठीक ठिकाणी शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने,पोलीस बंदोबस्त चोख तैनात करण्यात आला होता. कोल्हापुरात शाहूपुरी,बापट कॅम्प, गंगावेस, कुंभार गल्ली,आदी ठिकाणी श्री गणेश भक्तांच्या वाहनांसाठी, दुचाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली होती. एकंदरीतच सांगली आणि कोल्हापुरात श्री गणेशोत्सवाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले आहे.

सांगली-सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणरायाचे आज मोठ्या उत्साहात आगमन झाले असून,सांगली संस्थांनच्या गणपतीची आज षोडशोपचारे प्राणप्रतिष्ठापना झाली आहे.सांगली मधील सांगली संस्थांनच्या (पटवर्धन सरकार) श्री गणरायाचे मोठ्या जल्लोषात आगमन झाले असून,श्रीमंत विजय राजे पटवर्धन व त्यांचे कुटुंबीय त्यावेळी हजर होते. सांगलीचे वैभव असलेल्या व ग्रामदैवत असलेल्या श्री गणेशाच्या आगमन प्रसंगी, षोडशोपचारे पूजनाप्रसंगी, भक्त भावीक उपस्थित राहत असतात. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे श्री सांगली संस्थांच्या पटवर्धन सरकारांच्या प्रथेप्रमाणे,पारंपारिक रितीरिवाजानुसार,मिरवणुकीने गणपती आणून श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गायन सेवा, भजन सेवा व इतर सेवा श्री गणेश चरणी सादर होत आहेत.सांगली शहरात देखील आज विविध मंडळांत व  प्रथेप्रमाणे घराघरात श्री गणरायाचे मोठ्या उत्साहात जल्लोषात आगमन होताना दिसत होते. सांगली जिल्हा प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने सर्वत्र कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राहावी म्हणून,चौख नियोजन व्यवस्था व विवीध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top