जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
भारताचे ऐतिहासिक महत्त्वकांक्षी सफल झालेल्या व दक्षिण ध्रुवावर उतरलेल्या चंद्रयानाचे रोव्हर व लेंडर सोलर पॅनल आज चार्ज झाल्यानंतर,भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या म्हणजेच इस्रोच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.
भारतीय अवकाश शास्त्रज्ञांच्या मते 22 सप्टेंबरला 2023 रोजी सूर्यप्रकाशाने पुन्हा चार्ज होणे अपेक्षित असून, सद्यस्थितीत विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर हे दोन्हीही चंद्राच्या उत्तर ध्रुवावर आहेत.भारतीय अवकाश शास्त्रज्ञांच्या मते,22 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर,सूर्याकडून सूर्य किरणे येतील अशी भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोला आशा आहे.भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो येथील शास्त्रज्ञ,चंद्रयानाचे प्रज्ञान रोव्हर व विक्रम लँडरचे सोलर पॅनल चार्ज होऊन,पुन्हा आपल्या संपर्कात येतील अशी आशा व लक्ष ठेवून बसले आहेत.चंद्रग्रहाचे आणखी काही शास्त्रीय संशोधनातील दुवे मिळण्यास पुढील गोष्टीमुळे शक्य होईल का काय? हे बघणे भारतीय अवकाश संशोधन शास्त्रज्ञांचे म्हणजेच इस्रोचे औत्सुक्याने लक्ष लागून राहिले आहे.