जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
सुयोग सुरेश कार्वेकर व. व.38 रा. प्लॉट नंबर 10 सावकर गल्ली इंद्रायणी नगर जवळ मोरेवाडी कोल्हापूर.
रवींद्र आबासो पाटील व.व.42 रा. पाटाकडील गल्ली वाशी तालुका करवीर कोल्हापूर.
सुमित विष्णू घोडके व.व.33 रा. घर नंबर 66 58 प्रगती नगर पाचगाव तालुका करवीर कोल्हापूर.
याबाबत राजापूर येथील डॉक्टर सुभाष अण्णाप्पा डाक वय वर्ष 55 मुक्काम पोस्ट कनेरी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी अँटी करप्शन अधिकारी आहे असे सांगून तुमचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र बोगस आहे तुमच्यावर कारवाई करायचे आहे असे सांगून दवाखान्यातून इनोवा कारमधून कोल्हापूर येथे आणून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आणून तडजोड करत असता 112 येथे कॉल आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी जाऊन सदर सुयोग सुरेश कार्वेकर, रवींद्र आबासो पाटील,सुमित विष्णू घोडगे यांना पकडले हे तिघेही कोल्हापूरचे राहणार असून त्यांना ताब्यात घेतले. या तिघांनी दहा लाख रुपयांची मागणी करीत संबंधित डॉक्टरला राजापूर हुन कोल्हापूरला आलिशान गाडीतून आणल्याचे समजून येते.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके यांचे सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय श्वेता पाटील स. फौजदार संदीप जाधव,बाबा ढाकणे,रवी आंबेकर,शुभम संकपाळ,लखन पाटील, संदीप बेंद्रे, सतेज कार्वेकर, सतीश,सुर्वे आदींनी सहभाग घेतला.
पुढील तपास स.पो.नि.शीतल कुमार कोल्हाळ हे करीत आहेत.