कोल्हापुरातील गणेशोत्सव मंडळावर नोंद झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन !- - सकल हिंदू समाज कोल्हापूर.!

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

कोल्हापूर येथील ‘वाय.पी. पोवार नगर मित्र मंडळा’च्या श्रीगणेशमूर्ती आगमन मिरवणुकीत पारंपारिक वाद्ये वाजवली, वाहतूक कोंडी केली म्हणून जुना राजवाडा पोलिसांनी कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंद केले आहेत.सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतांना मशिदींवरील भोंगे हटवण्याचे, मजारींचे अवैध बांधकाम पाडण्याचे धाडस पोलीस प्रशासन दाखवत नाही; मात्र केवळ हिंदूंच्या उत्सवात मिरवणुकीत कायद्याचे नाव पुढे करून कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, अशी भावना सकल हिंदू समाजाची होत आहे. तरी यापुढील काळात हिंदूंच्या उत्सवांच्या मिरवणुका काढण्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध केला जाऊ नये, तसेच गणेशोत्सव मंडळावर नोंद झालेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना देण्यात आले.

या प्रसंगी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शहराध्यक्ष गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव,शहर कार्यवाह आशिष लोखंडे, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सोरप, राजू तोरस्कर, सेवाव्रत प्रतिष्ठानचे सचिव संभाजी (बंडा) साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, भ्रष्टाचार विरोधी जनजागृती समितीचे प्रांत उपाध्यक्ष  आनंदराव पवळ, युवासेनेचे भाऊ चौगुले, सुशील भांदिगरे, हिंदुत्वनिष्ठ आबा जाधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top